labels

Saturday, 1 December 2018

उसळणाऱ्या लाटातून
जणू आनंद व्यक्त करतो
फेसळणार पाणी
सदैव हास्य फेकीत राहतो
         सागर

Wednesday, 21 November 2018

सदैव आनंदी
अशीही माणसं असतात
दुःखात ही सुख शोधण्यात
ती नक्कीच तरबेज असतात
       *सागर*

Monday, 19 November 2018

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

चार ओळींच
तसं बरं असतं
थोडक्यात चार ओळीत
म्हणणं मनाला स्पर्शून जातं
    सागर
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
नातं तुझं अन माझं
भलतंच सुरेख होतं
रंगीबेरंगी धाग्यांनी विणलेलं
अतूट अन बेजोड होतं
 सागर
सकाळच्या प्रहरी
पावसाचं येणं
धरणीला भिजवून
तृप्त करून जाणं
  सागर
अचानक आज
पाऊस प्रगटला
रिमझिम बरसून
चिंब भिजवून गेला
        सागर
पावसाचं तसं
मन मर्जी काम असत
देणं घेणं कुणाशी नसतं
पाहिजे तेव्हा बरसण असतं
            सागर

Tuesday, 13 November 2018

बोचरी थंडी
गोठवणारा वारा
तुझ्या आठवणीने शहारतो
रोम रोम सारा
सागर
बोचरी थंडी
गोठवणारा वारा
तुझ्या आठवणीने शहारतो
रोम रोम सारा
सागर

Saturday, 10 November 2018

ईश्वर
नेमकं काय
मानवाची कल्पना की
कल्पने पालिकडलं सत्य

ईश्वर
नेमकं काय
मानवाच्या मेंदूचं तत्वज्ञान की
तत्वज्ञाना पलीकडलं ज्ञान

      सागर

Tuesday, 6 November 2018

अंतरातला आत्मा
न कळत बोलून जातो
शब्द मांडताना सखे
मी न माझा राहतो
         सागर

Sunday, 4 November 2018

रात्र काळोखी
खुलली चांदणी
मंद मंद हास्य तिचे
पसरे अंगणी
सागर
गावात स्वागताला
मोठी कमान आहे
आदरातिथ्य तिथेच वसलेले
मना मनांत दडला
फक्त स्वार्थ आहे
     Sagar

Saturday, 3 November 2018

आम्हास न कळे
अशी ही तयांची भाषा
भाव खोल गहिरे
कधीतरी व्यक्त होतील
ही एकच आशा
        सागर
आम्हास न कळे
अशी ही तयांची भाषा
भाव खोल गहिरे
कधीतरी व्यक्त होतील
ही एकच आशा
        सागर

Thursday, 1 November 2018

विश्व घरट्यापुरतं ठेऊन
तो चिमणा खुश होता
तिनका तिनका जोडून
घरटा त्याने बनवला होता
सागर

Sunday, 28 October 2018

बीज टरकण फाटला
निघाला इवलासा अंकुर
जीव असे कोवळा त्याचा
जणू राजबिंडा राजकुमार
       सागर

Saturday, 27 October 2018

कळलंच नाही कधी
लेखणी वास्तवदर्शी जाहली
टाकात बुडवून लिहिण्याची
आम्हास धास्ती लागून राहिली
         सागर
हल्ली शब्दांच्या पाठी
लागणे सोडले आहे
म्हणूनच की काय
रंग त्यांचे असे उडले आहे
     सागर
उडणाऱ्या पक्ष्यांच्या थव्यामधल
बनुनी पाखरू चिमुकल
उडावं आसमंत भरून
बनवूनी धरतीला थीटूुकल
   सागर

Thursday, 18 October 2018

परिणाम प्रत्येक विचाराचा
तना मनावर होत असतो
चांगला की वाईट हे
नकळत आपणच ठरवतो
     सागर
गणित कुणाच बिघडलं
हे मला उमजेना
हिवाळ्यात पाऊस
अन पावसाळ्यात उन
निसर्गाचा ह्यांग ओव्हर
काही उतरेना
       सागर 

Wednesday, 17 October 2018

बरेच दिवस झालेले
पानगळ होऊन
झाड ही थकलं होत
वाट अंकुराची पाहून
शेवटी दया आली दवाला
आला सोबत घेऊन अंकुराला
मग कुठे झाड मोहरल
नव चैतन्याने जणू नाचत सुटलं
सागर
माणूस वेडा प्राणी
काय च काय करून ठेवलं
प्रेम बीम नवे शोध लावून
जिंदगी ला झुरू झुरू मारलं
            सागर
लिहायचं होत आज काही
हाती घेतली मग लेखणी
लिहायचं सोडून रेखाटली गेली
तसबीर त्या क्षणांची देखणी
        सागर
ओठातून पडलेले शब्द
तिला उमजलेच नाही
मनाची मेंदू वर मात
सारं च विलक्षण नाही?
  सागर
व्यक्त होता येत नाही
हे एक चांगलं आहे
मुरून मुरून लोणचं
व्वा क्या बात है
     सागर
हे असं जागणं
बरं नव्हे
चंद्राची वाट अमावास्येला पाहणं
 नक्कीच खरं नव्हे
      सागर 

Wednesday, 3 October 2018

तांबूस पिवळे रंग कोवळे
नभी अलगद उमटले
कोण रेखाटतो तयांना
आणतो कुठले कुंचले
          सागर
भावतात ते रंग सोनेरी
सूर्य अस्ताला जाणारे
शांत करतात उद्विग्नता
सदैव मनाला बोलणारी
सागर

Sunday, 30 September 2018

वेचता वेचता कशी बरे
ओंजळ भरून गेली
नजरांच्या प्रश्नोत्तरात
प्रीत बहरून आली
       सागर
तत्वज्ञानाचे डोस
पचनी पडणे कठीण असते
म्हणूनच कधी कधी
अज्ञानीच असणे बरे असते
      सागर
उदंड जाहला पैसा
अति हायटेक त्याने माणूस हो
ह्रदय बनविले क्रुत्रिम त्याने
प्रेम कसे त्यात वसेल हो
©  सागर
अजब आहे ना विश्व
तुझ्या माझ्या सारखं
ओढ आहे कणा कणात
पण....
 एकमेकांस सदैव पारखं
सागर

Wednesday, 19 September 2018

रात्र झाली वेडी
सज सज सजली .
आमावस्येचे निमित्त सांगून
चंद्राने मात्र दडी मारली
  सागर©


सागर......

Saturday, 15 September 2018

बिशाद या नजरेची
भिडविण्याची त्या नजरेशी
कधी झाली च नाही
       भाव या मनाचा
       त्या मना पर्यंत          
 कधी पोहोचला च नाही
                  सागर

Tuesday, 4 September 2018

उधाणलेला समुद्र
उच्छाद मांडणारा वारा
ढगांच्या छत्रछायेत
वरून बरसतात गारा
       सागर

Friday, 31 August 2018

काही हळूवार होत्या
काही बोचऱ्या होत्या
आठवणी तुझ्या नि माझ्या
भलत्याच सुरेल होत्या
सागर

Thursday, 30 August 2018

मन माझं
भटकेल कधीतरी..
सावरत जा गं केव्हा तरी..

मन माझं
क्षुल्लक वाटेल असं सांगेल तुला काहीतरी..
तुझंच मन बोलतंय असं समजून
ऐकून घे कसंतरी..

मन माझं
वेडं आहे भुलतं जगाला सहज फसतं थोडं वेंधळं भासतंजरी..
शहाणं मानून उराशी कवटाळून प्रेम देवून सत्य दाखवून गोंजर त्याला थोडंतरी...


©सागर


Saturday, 25 August 2018

बुडबुडे पाण्यावरचे
किती क्षणभंगूर
आयुष्य ही तसंच
जगावं मनभर
     सागर

Sunday, 19 August 2018

मनाचा कमकुवतपणा किंवा
अज्ञान ही असाव व्यसन
दुःख असेल खोलवरचं
बरेच पैलू असणारं व्यसन
        सागर
प्रश्न सुटेना त म्हणून
व्यसनाचा सहारा घेतला जातो
ते प्रश्नांचं उत्तर नसून
आणखी असंख्य प्रश्नांचा
जन्म होतो
              सागर

Wednesday, 15 August 2018

विचलित झाले मन
तुझ्या येण्याने
बेचव अळणी भासे सारे
तुझ्या जाण्याने
      सागर
नक्कीच काहीतरी बिनसलं
माझ्या त्या श्वासांच
पाहता तुझं नयनांनी
गणित ते फसलं या ठोकयांच
               सागर

Thursday, 2 August 2018

काय हवंय मला
आज पर्यंत उमगलं नाही
कधी कधी दाटणाऱ्या निराशेच
कदाचित कारण हे तर नाही
    सागर

Sunday, 3 June 2018

भला थोरला तो वृक्ष
उन्मळून पडलेला
रात्रीच्या वादळ वाऱ्यात
अखेरचा श्वास त्याने घेतलेला

का असे घडले असावे
हिमालयापरी अढळ
निश्चल असा ज्याचे
समूळ उच्चाटन व्हावे

आजवर कित्येक त्याने
वादळे त्याने पाहिलेली
काल रात्रीच का बरे त्याने
स्वतःहून आहुती दिलेली

असेल का हा
महिमा काळाचा
एकदा फिरला की
अंत त्याचानिश्चित व्हायचा
   सागर

Sunday, 6 May 2018

शृंखला विचारांची

पहिल्या विचाराला
दुसरा चिकटतो
तिसरा दुसऱ्याला चिकटून
हळू हळू शृंखला  बनवतो

विचारांच्या शृंखलेला
दोनच मार्ग असतात
सकारात्मक व नकारात्मक
परस्पर विरोधी असतात

सकारात्मकतेतून
आनंद प्राप्ती होते
नकारात्मकता मात्र
नरकाची वाट दाखवते

सकारात्मक व्हायचे तर
जागरूक व्हायला हवे
नकारात्मक तेवढे विचार
शृंखलेतून बाहेर काढायला हवे
            सागर

Thursday, 26 April 2018


नात्याला गेलेला तडा
दिसताना सूक्ष्म दिसतो
वज्रासारख्या खडकाला
लागलेला सुरुंग असतो
         सागर

Friday, 9 March 2018

विचार पुरुषी
पहा ना कसे असतात
म्हणे स्त्रियांवर
अधिराज्य गाजवतात

भारतात संस्कृती
आपण महान म्हणतो
चाकोर्यांच्या वाटेवरून
आपण इथे चालतो

पश्चिमात्यांच्या साहित्यात
चाकोऱ्या भिन्न भासतात
स्त्रिला पुरुष तिथे
सम समान वागवतात

आमच्या इथे परंपरेने
Dominancy बिंबवली
न कळत स्त्रीने इथे
नरमाई अंगिकारली

ढाचा कुटुंबसंस्थेचा
बदलणे कठीण आहे
समानता राबवायची तर
एल्गार स्त्रीच्याच हाती आहे

         सागर

Thursday, 8 March 2018

चेहऱ्यावरी आलबेल
जरी सारे भासे
कासावीस जीवा तू
का भरसी उसासे
         सागर

Wednesday, 7 March 2018

पाऊल खुणा
इवल्या इवल्या
जाळ्या नक्षीदार
नकळत कशा त्या विणल्या
         सागर

Thursday, 22 February 2018

टोन तुझा नेहमीचा
लक्षात माझ्या आला होता
भीतीने गळाटा
मनाच्या आमचा झाला होता
सागर

Sunday, 11 February 2018

अमेरिकन युरोपिअन लोकांबद्दल कुतूहल मला नेहमीचच त्यांचं culture, फमिली ,society आपल्याहून भिन्न............ माणूस म्हणून जगायला भरपूर वाव. उलट पक्षी आपल्याकडे सारी बंधने .यांना बंधने नसल्याने आयुष्यात मजल खूप मारता येते कि आपल्यासारख्या थोड्या बहुत शिकलेल्यांना त्यांचा हेवा वाटावा .यांचे लेखकही तसेच, यांच्या कादंबर्या वाचल्या  कि आपल्याला जाणवते कि हे हि विषय लिखाणासाठी असू शकतात . असो ......
          एक युरोपिअन लेखिकेच ,  family थेरापिस्त च  एक पुस्तक हाती आले तेव्हा त्यांचे प्रोब्लेम्स समजले. तिथली .विभक्त कुटुंब पद्धती, तलाकच जास्त असलेले प्रमाण आणि मानसिक रोगांच भयानक प्रमाण मन सुन्न करणार आहे
                             भारताला मागासलेलं जरी आपण समजत असलो तरी इथल्या समाज व्यवस्थेमुळ कुटुंबव्यवस्थेमुळ  थोडस मेरा भारत महान म्हणावस नक्कीच वाटत म्हणजे मानसिक स्वास्थ्य थोडस जाणवत पण आपली शहरेही हळू हळू westernisation कडे झुकू लागली आहेत तेव्हा आपणही सावध व्हायला हव अस हळू हळू वाटायला लागलंय 
                                                       @@सागर @@


Sunday, 4 February 2018

हरवलेला मी
कुणाला शोधतो
दुनियेचे चक्रव्यूह
दुरूनच न्याहाळतो
        सागर
कोकीळ गातो
कुणासाठी........  ?
मोर नाचतो
ज्याच्यासाठी .
  सागर
मनगटावरची घड्याळे
पडद्याआड होऊ लागली
अंकंडिशनल प्रेमाची अवस्था
थोडीफार तशीच झाली
         सागर

Friday, 2 February 2018

समय प्रभातीचा
निरव शांततेचा
प्रसन्न वातावरणात
इशास आळवण्याचा
सागर
चारोळी म्हटलं
फेर शब्दांचा
तालात नाचती सारे
मेळ बसवून सुरांचा
सागर
झोळी भगवंता
तुझी अनाकलनीय
प्रेम वाटुनिया सर्वाना
कटोकट ती अतुलनीय
सागर
रुसून रुसून
गडे फुगू नको
फुगलीस जरी
निदान फुटू नकोस
 सागर
जात शब्दांची
व्याकरणात शिकलो होतो
माणसातील जातीने
माणुसकी विसरलो होतो
सागर
हसलेले ते सारे
पुरते फसले होते
एक क्षणात पिवळे
दात त्यांचे दिसले होते
सागर
हेवा मी
शब्दाचा करतो
नखरेल तो
हाती कधीच येत नसतो
सागर
भेट ती क्षणांची
आयुष्यास पुरून उरली
आठवण आजही तिची
गहिवर मज आनी
सागर

Tuesday, 30 January 2018

खोचक नसलं तरी
रोचक होतं
त्या जीर्ण फुलाचं दिसणं
वेड लावणारं नक्कीच होतं
     सागर
त्या जीर्ण पर्णाची तमा
खचितच वृक्षास नव्हती
नव अंकुराने हर्षोल्हासित
जगाची ती रितच होती
           सागर

Friday, 26 January 2018

सावलीला म्हटलं थांब
तुला करकचून बांधतो
माणसा किती रे खुळा
स्वतः च स्वतःला जखडतो
           सागर

Wednesday, 24 January 2018

क्षितिजावरती चांदणे
शिंतोडे शुभ्र रंगाचे
कुठे मृग कुठे सप्तर्षी
चित्रकारा कसब कमालीचे
       सागर
बेरकी रात्र ही
पहा कशी खिजवते
चंद्र तिच्या सोबतीला
वाकुल्या मज दावते
        सागर

Tuesday, 23 January 2018

तू कवेत घेतेस तेव्हा 
मी न माझा राहतो 
माग हरवलेल्या पाडसाला 
माग मृगाचा घावतो 
         सागर 

Sunday, 21 January 2018

आनंद शिकण्यातला ...............
  आनंद हा शब्द सगळ्यांनाच आवडतो
   मग तो भेटीतला , काही सापडन्यातला , आणखीही कशा कशातला
    पण
             काही शिकण्यातला आनंद काही गोडच म्हणावा लागेल.
    खरच
        कुणी तरी म्हटलंय मानसान सदैव शिकाव शिकतच राहावं
                                           
                                                सागर
         
  

Thursday, 18 January 2018

आलेल्या विचारांना
वाहतं ठेवायचं असतं
साचवून साचवून त्यांचं
डबकं बनवायचं नसतं
           सागर

Thursday, 11 January 2018

कट्यार खोलवर
संग कशी घुसवलीस
घात उरी बाळगताना
प्रीत कशी विसरलीस
  सागर   
प्रेम करण्यासाठी
वेड बनाव लागतं
जाणवून देण्यासाठी प्रसंगी
झुर झुर झुराव लागतं
सागर 
असू देत ते वेडे मन
माझेच मजपाशी
दिसते वेडे तुज जरी
तोड नसे त्याची कुणापाशी
        सागर  
कस  ना हे मन
स्वतः ला च  कळत नाही
पोक्त होऊन हि
पोरकट पणा सोडत नाही
 सागर