labels

Thursday 21 December 2017

जळमटांची पुठ्ठ
मेंदूत साठलेली
कलीयुगात संभ्रमाच्या
वाट धुक्यात हरवलेली
             सागर

Monday 18 December 2017

तप्त झाले शब्द
अंगार जणू भावना
लाही लाही वेदनांची
मन माझे जाण ना
        सागर

Tuesday 12 December 2017

कसं जमतं रे तुला
एवढं कठोर होणं
काटे हृदयात खुपूनही
हास्य ओठांवर आणणं
         सागर

Wednesday 22 November 2017

धकाधकीत सार्या
जगण्यास वेळ नाही

दमलो पळू पळूनी
थांबण्यास वेळ नाही

जीवन रडगाणे झाले
हसण्यास वेळ नाही

खोल उरी या जखमा
रडण्यास वेळ नाही

नात्यांत उसवले धागे
शिवण्यास वेळ नाही

जाण्याची वेळ आली
जगण्यास वेळ नाही

       सागर 
पाउस पडत असताना
पाखरे घाबरून दडतात
एकदा का उघडला
गाणी गात सुटतात 
         सागर

Saturday 18 November 2017

आता मला सवय झालीय
एकट ऐकटं राहण्याची
आठवणींच्या गर्दीत
स्वतःला सावरण्याची
    सागर
रात्र अन थंडीची
गट्टी तशी जुनीच
अंधारून आलं की
हुडहुडी भरून आलीच
      सागर
पहाडावरच्या त्या दगडाला...
कसं बरं जमत;
सर्व काही सोसून
एकट राहणं बर जमतं.
        सागर
मन माझं स्थिर नसतं
चंचल तरी कुठं असतं
नुसतच वल्गना ठोकत
 प्रत्यक्षात कुठं काय करत
           सागर

Thursday 16 November 2017

मनाला विचार
सावलीसारखे चिकटलेले;
क्षणभंगुर दोन्ही तरी
पडसाद ठळक उमटलेले.
            सागर
सावलीला म्हटलं थांब
तुला करकचून बांधतो
माणसा किती रे खुळा
स्वतः च स्वतःला जखडतो
           सागर
स्वप्नानाही तू
सावलीसारखी चिकटलेली,....
श्वासांनी स्वामींनी
तुलाच निवडलेली....
       सागर

Tuesday 31 October 2017

वाळलेल्या फांदीवरही
कुणीतरी बसावं
मूक रडवेल्या बिचारीला
कुणीतरी हसवावं
      सागर

Friday 15 September 2017

प्रयत्न जिथे
अपुरे पडतात
विज्ञानाच्या सीमा जिथ
संपुष्ठात येतात
सत्य जिथ धूसर बनत
तिथ देव रुपी असीम शक्तीचा
आरंभ होतो
सागर 

Monday 11 September 2017

तू दूर होण्याच्या भितीनं
तुझ्यावरच प्रेम मला जाणवलं
त्या नुसत्या जाणीवेन
मला समूळ हादरवलं
सागर

माझ्या खट्टू मना
असा का वागतोस
रुसून तू बसतोस
इकडे जीव कासावीस होतो
सागर....

Wednesday 30 August 2017

स्वप्ने कशी चिरडली
काळाच्या पायाखाली
इवली इवली बिचारी
खुडली याच नभाखाली
सागर 
कट्यार खोलवर
सांग कशी घुसवली
घात उरी बाळगताना
प्रीत कशी विसरली
सागर........

Saturday 19 August 2017

इवली इवली चिमणी
भिज भिज भिजली
गारठून बघा कशी मग
आडोश्याला दडली
सागर
ढगच ढग दाटलेले
रिमझिम रिमझिम बरसणारे
कधीही येतील थेंब टपोरे
ओले चिंब भिजवणारे
सागर 

Thursday 17 August 2017

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे 
नेमक काय असत 
जेव्हा भांडण उभारत 
तेव्हा कुठे जाऊन बसत

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे 
नेमक काय असत 
जेव्हा राग उगवतो 
कस बर ते मावळत

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे 
नेमक काय असत 
जेव्हा काही हव असत
तेव्हाच का बर बरसत 

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे 
नेमक काय असत 
स्वार्थाच्या बाजारात हि 
सहज ते विकत

प्रेमा तुला डागाळण्याचा 
माझा हेतू नव्हता 
जे दिसतंय ते मांडण्याचा 
स्वच्छ प्रयत्न होता 
सागर 


Wednesday 16 August 2017

नाण्याला दोन बाजू
जितक खरय
टाळण्याच्या पाठीमागे ओढ
तितकाच खरय
सागर
सका सकाळी
फुलली टपोरी फुले
एक एक थेंब दवाचा
ऐटीत त्यावर डुले
सागर
तु अशीच रहा
मोगर्याच्या कळीसारखी
प्रेमाचा सुगंध घेऊन
बंद अत्तराच्या कुपीसारखी
सागर .......

Wednesday 9 August 2017

नजरे पल्याड
जात जाऊ नकोस
सदैव नजरेतच राहा
जीव माझा जाळू नकोस
सागर ......

माझे सूर
गीत गातात
तुलाच शब्दात
ते गुंफतात
सागर ......
काहीसे अबोल
काहीसे लाजरे
अर्ध मिटलेले
नयन ते बावरे
सागर......
छेडू नको म्हटलं
तरी छेडतात
आगाऊ शब्द माझे
पाठी तुझ्याच लागतात
सागर  .........
बर्याच दिसांनी
ऋतू  बहरला
धरणीने हि मग
हिरवा गालीचा पसरला
सागर ......
हर्षान लुब्ध 
निर्झर कोसळत होता
बिचारा खडक खाली
आघात सोसत होता
सागर ........
अंत खरच नाही
मनाचा अन भावनांचा
अपुरेदोरखंड सारे
खेळच सारा शब्दांचा
सागर ........

Saturday 17 June 2017

लख्ख ऊन्हात
एकटाच बरसत होता
मनाचा राजा तो
कुणाची फिकीरच करत नव्हता
सागर.....
सोसाट्याचा वारा
फर्मान घेऊन धडकला
क्षणाचाच यथावकाश
मेघगर्जनेसह राजा बरसला
सागर...
केव्हा कसा कुठे
तो मेघ बरसेल
तेव्हा तिथे तिथे
तृप्ती अन शांति पसरेल
सागर

Friday 9 June 2017

स्वप्नांचा इंद्रधनुष्य
भलताच सुरेख असतो
मनाच्या बरसण्यानंतर
सुंदर कमान करतो
सागर.....
खदखद मानातील
अशीच बाहेर येऊ दे
मोकळ मोकळं होऊन
मळभ नाहीसं तरी होऊ दे
सागर.....
वाटांवरची माती
जमिनीत एकरूप झाली
त्या एका सरीनेच
अद्भुत किमया केली
सागर....

Friday 19 May 2017

तो कट्टा अन
ती बुडणारी सायंकाळ
आठवत राहते
तो कधी न परतनारा काळ
सागर....
काय होतं त्याला
ठाऊकच नाही कुणाला
बहरतो क्षणातच...
कोमेजे आठवून अनभिज्ञ क्षणाला
सागर.....
चित्त चोरणारे
तुझे ते नयन मखमली
हृदयाचा ठाव घेई
ईवली नाजूक खळी
सागर.....
आयुष्या तुजशी मी
सांग का रागवू
घात माझेच करती
का तुज दोषी ठरवू
सागर.....

Saturday 13 May 2017

उगवतात शब्द तेव्हा
सूर्य जेव्हा बुडत असतो
सरकतो कणाकणांनी
इकडे शब्द बहरत असतो
सागर......
प्रेम नसतं....
सांगा तरी कशात
विरह जाणवला की समजावं
पूर्ण आयुष्यचआहे त्याच्यात
सागर........

Thursday 11 May 2017

स्वप्नांची ती
चंदेरी दुनिया
भासच असतो
दैवाची निराळीच किमया
सागर.....
प्रेम ही गोष्टच
भावनांत गुरफटलेली
सर्वस्व फिके
ज्याच्यावर जडलेली
सागर......
कधी कधी भावनांचा
 मेळ लागत नाही
ओसंडून मग वाहतात
त्या.....
थांबता थांबत नाही
सागर......
जीवन जणू
वळणावळणांनी भरलेलं
कापायचं अंतर
वरूनच ठरलेलं
सागर......

Monday 8 May 2017

रात्र आज जास्तच
गहिरी भासत होती
काळ्याकुट्ट आंधारात
भीती अंग शहारत होती
सागर....
विरह तिचा त्याला
डंख मारित होता
आठवणींचे विष तन मन
बधीर करत होता
सागर....
स्वप्ने आकाशातली
तळ्यात उतरली
प्रतिबिंबे त्यांची डोळ्यांत
चमकू लागली
सागर.....

Monday 1 May 2017

मनाला आवरतो म्हणून
ते आवरत नाही
अन्
स्वैर सोडलं  तर
जागा तसूभर सोडत नाही
सागर....

प्रत्येक वेळेचं
वेगळं असं वैशिष्ट्य असतं
पहाट अल्हाददायक तर
हुरहूर....
...... कातरवेळचं देणं असतं .
सागर...
रूणानुबंध ....
न कळत जुळतात
नश्वर ते ही ....
तुटताना वेदना देऊन जातात
सागर......
रूणानुबंध ....
न कळत जुळतात
नश्वर ते ही ....
तुटताना वेदना देऊन जातात
सागर......
धुंद दाही दिशा
मुग्ध थंड वारा
मनाच्या या स्थितीत
साद घाली निरभ्र आसमंत सारा
सागर.....
तारांना छेडावं
मग सुरांनी बहरावं
एकटक माझ्या नजरेला
पाहून  नकळत तू लाजावं
सागर
विचारांना नसतो
स्पर्श ना गंध
तरी मनाला जाणवतो
त्यांचा वेगळाच सुंगंध
सागर
प्रणाम माझा
त्या महान राष्ट्रा
आसमंतात निनादू दे
जय जय जय महाराष्ट्रा
सागर..........
तुझं व्यक्त न होणं
मला जास्त जाचतं
सल दाबून जिरवणं
जिव्हारी माझ्या लागतं
सागर......

Sunday 23 April 2017

रात्र झाली वेडी
सज सज सजली .
काळ्या कुट्ट साडीवर तिच्या
चांदण्यांची किनार शोभून दिसली .
सागर......
अदृश्य काही बंध असतात
अनमोल काही नाती.
घट्ट असताना भासती जणू
मजबूत भक्कम भिंती
तुटली की उरतात फक्त
भग्न..दगड अन माती
सागर....

Friday 14 April 2017

हिरवी पालवी
थंडगार छाया
निसर्गा तुझी
न्यारीच किमया
सागर......
स्वप्न पाहू नकोस
त्यातही मीच आहे
तुझ्या क्षण क्षण आयुष्यात
फक्त मी आणि मीच आहे
सागर.....
शुष्क पणाचीही
एक मर्यादा होती
आमच्या ओल्या प्रेमाची
त्यांना कुठे कदर होती
सागर......
gn

Thursday 13 April 2017

असं हे आमचं
साधं सुधं मन आहे
त्याचं विचार करणंच मात्र
अति कूल आहे
सागर...
gn
स्वप्न वादळांचीच
हल्ली का पडतात
गडगडाटी वीजाही मग
मनात धस्स करतात
सागर.....
मनाच्या वहीवर
आपल्या प्रेमाचं चित्र रेखाटलंस
मनासारखं नाही झालं की
चक्क टराटरा फाडलंस
सागर...
वादळं कैक मनाची
आम्ही रिचवली
त्या मंद झुळूकेनं मात्र
नौका आमुची  बुडविली
सागर.....
वादळ कालचे
आज शमले होते
एका तडाख्यात त्याने
सर्व उध्वस्त केले होते
सागर
शब्दांनी माझ्या
तिला घायाळ केलं होतं .
जखमांनी ऊठवलेलं वादळ
आता माझ्यावर थडकणार होतं .
सागर....

Wednesday 12 April 2017

जाणीव पूर्वक समाजाला
एका मार्गाने नेले जाते
अज्ञानाच्या अंधारात ठेवून
फक्त आणि फक्त लुबाडले जाते
सागर...
मस्तक सशक्त झाल्याशिवाय
लोकशाही सुधारणार नाही
अन मस्तक सुधारण्यासाठी
शिक्षणाशिवाय पर्याय नाही
......सागर.....
लोकशाहीत आमच्या
व्यसाय झाले राजकारण
समाजसेवा दूरच
ईथे फक्त अर्थकारण
सागर....
अन्न अन निवार्यातच
सर्वसामान्य गुंतला
लोकशाहीचे रक्षक म्हणवणार्यांनी
आख्खा देश लुटला
सागर....
नशीब आहे आमुचे
आम्ही भारतात राहतो
सर्वात मोठ्या अन बलशाली
लोकशाहीत वावरतो
सागर...,,

Tuesday 11 April 2017

मातीशी नाते गावच्या
काही औरच असते
अगदी स्वर्गात गेला तरी
परतून यावेसेच वाटते
सागर....
गाव माझा
आता तसा उरला नाही
झगमगाच्या ओढीनं
माणूस तिथं उरला नाही
सागर....
गावठी खेळांचे
काही दिवसांनी कोचिंग दिसतील
बाहुल्यांसारखी दिसणारी मुलं
फी देऊन प्रवेश तिथं घेतील
सागर......
गाव माझा तसा
टुमदार आहे.
अंगठीमध्ये जणू बसविलेला
पाचूचा खडा आहे
सागर.,
रामा आमच्या गावचा
तसा अडाणीच दिसतो
गांवढळ दोन चार शब्दात
जीवनाचं सार उलघडतो.
सागर....
काय शोधतोस रे
..सारखं सारखं....
मनाला मी विचारलं
चलबिचल त्याची होऊन
पुन्हा ते शून्यात हरवलं
सागर,......

Tuesday 4 April 2017

ठोका हृदयाचा
नेहमीच धडकतो
तुझी आठवण येताच
हलकीशी कळ देवून जातो
सागर......
गूढ डोळ्यांचे
कसे कळावे
भाव ओठांवरी 
का बरे रूकावे
सागर
मेंदूच विचारांचा
लोच्या करतो
कधी नियंत्रित तर
कधी डायरेक फ्रिज करतो.

  • सागर.....
कैरी झाडावर
आंबट भासली
जिभेवर विरघळल्यावर मात्र
जास्तच रोमँटिक लागली

  • सागर.....

Sunday 26 March 2017

मनाच्या आमच्या
थांग ना पत्ता
त्यावर चालते फक्त 
तुझीच सत्ता
सागर...
शुभ्र चांदणी गं नभीचे
आज अशी रूसलीस का
ऊत्तर दे सवालाचे माझ्या
पाठ अशी फिरवलीस का
सागर
मुकी झाडे अन
शांत ती पाखरे
सुख शांततेतच मानवा
सुखाचे गमक जाण रे
सागर
क्षण आयुष्याचा
तसा तटस्थच होता
मनाला सुख दुःखाचा
विकल्प निवडायचा होता
सागर

Saturday 25 March 2017

काय शोधतो मी
 नभाच्या प्रभेत
क्षणभंगूर प्रभाही
काळोखाच्या मिठीत
सागर.....

Sunday 19 March 2017

तुला माझ्या जागी
थोडं ठेवून बघ
काट्यांची बोच
तूही सोसून बघ
सागर
उच्चारलेला एक एक शब्द
तसा खूपच पावरफूल असतो
विचारांच्या जात्यांतून
पिसून निघालेला सार असतो
सागर....

Wednesday 15 March 2017

तोच दर्द अन
तीच भावना
तोच दुरावा अन
घालमेल का थांबेना
सागर......
किती पाहशील वाट
त्या अल्लड क्षणांची
आत्ताच छेडू दे तार
त्या अवखळ मनाची
सागर.....

Monday 13 March 2017

आपल्याच नादात तो
भ्रमर वेडा झाला
कळीच्या नादी लागुनी
प्रेमात गुंग झाला
सागर.....
या शब्दांची ग
या भावनांची ग
एक  माळ ओविली मी
अन ती तुलाच आर्पिली मी
सागर...

Saturday 4 March 2017

एक एका अश्रूसह
मन पाषाण बनले
तुझ्यासाठी पाघळणारे
हृदय वज्र बनले
सागर..,.

Thursday 2 March 2017

सरी बरसल्या अन
चिंब चिंब न्हाले
टपोरे थेंब झेलूनी
मयूरही बेभान झाले
सागर.....

Sunday 26 February 2017

सवाल गहिरे या दिलाचे
सांग माझी होशिल का?
हासण्यावारी नेऊ नको
जवाब प्रितीचा तू देशील का ?
सागर.....
घड्याळाचे काटे
शांततेतच जाणवतात
क्रोधाच्या गोंगाटात
महाभयंकर घंटाच वाजतात
सागर......

Saturday 25 February 2017

ती कडक दुपार
जरा जास्तच शुष्क होती
पिवळी पडलेली पर्ण
आपसुकच माना टाकत होती
सागर ....
विचारांवर विचारांनी
जाळे विणले
विचारांमध्ये गुरफटल्याने
वास्तवतेचे भानच हरपले
सागर.....
हे बदलणारे रंग नभा
कुठून रे आणतोस
शुभ्रनिळा रंग घेऊन
असीमतेची झलक दावतोस
सागर....

Thursday 23 February 2017

शब्द पकडावे
अलगद सोडावे
भाव अंतरीचे
सुरांसह छेडावे
सागर.....
नयनांची मैफिल
गडे सजली
तिला पाहताच मी...
पापणी पाडून
लढण्याआधी हार मानली
सागर...
चांदणे नभीचे
काय खुणवी मला
ऊन्हात शीतल तयाच्या
भेटीस बोलवी तुला
सागर ...
धडधडते हृदय
कासावीस बघ नयनही
आतूर झाले मन वेडे
काढ थोडी सवडही
सागर.....,
भेळ थोडी
मिसळही हवी
झणझणीत चटणीबरोबर
कांद्याचीही साथ हवी
सागर......

Tuesday 7 February 2017

नक्षत्रे अन चांदण्या
निरभ्र आकाशातच चमकतात
शुभ्र असो वा काळे मेघ
बलशाली सुर्यालाही गिळतात
सागर......
शब्दांच्या वारूंना
मीही सैल सोडतो
बांध क्षितीजाचा
त्यांना मग अपुरा पडतो
सागर....
क्षीण झालेल्या तार्याचे
कृष्णविवरच का बनते
प्रकाशात नांदणार्या विश्वाचे
सुख सांगा त्यास का सलते
सागर.......

Saturday 28 January 2017

ते हासणे अन
खळीसह लाजणे
मन कासावीस होई
सखे असे तुझे वागणे
सागर .....
वाट अडवी मनाची
तगमगे मग भावना
विचार कर या दिलाचा
हृदयाचे दार जरासा खोलना
सागर......
सुख म्हणे दुःखाला
रंग अदृश्य माझे
जरी व्यापलेस जीवनाला
एक क्षणही पुरे माझा
पेलावया  ओझे तुझे
सागर........

Sunday 1 January 2017

मनमोहक तू गडे
जीवा लागला घोर
नयन तीर तलवार
नाचती मनी मोर
सागर....
बावरलेल्या त्या हरिणीचे
धडधडत होते हृदय
झुकल्या पापणीचे कारण होते
प्रेमाचे ते वलय
सागर.......
सुर नव्हे तो आवाज होता
खोल हृदयातला
गीत म्हणणार्यांना कसे उमजे
भाव त्या प्रितीतला
सागर....
थंड झाले भाव अन
बेधुंद झाल्या भावना
सांजसमय रेंगाळली
एक शब्द तरी सखे बोलना
सागर.....