labels

Tuesday, 3 September 2019

तूर्त या मनास
क्षणभर उसंत नाही
व्यग्र ते आनंदाच्या मैफिलीत
दुःखाची छटा त्याच्या मुखी कुठेच नाही
           सागर

Friday, 5 July 2019

हवेत थेंब पावसाचे
अविरत बरसणारे
तयार होतील हिरवे गालिचे
नयन मोहविणारे
सागर

Friday, 31 May 2019

खोल झालेल्या जखमा
काळाबरोबर भासल्या भरलेल्या
वर वर दिसल्या गोजिऱ्या
आतुन मात्र तेवढ्याच ठस ठसलेल्या
      सागर
अंतरंग मनाचे
खोल अन गहिरे
ठाव ना ठिकाना
मापदंड सारे अपुरे
सागर

Monday, 27 May 2019

      फास लेंनीनग्राडचा
   कहाणी रक्त गोठवणारी
   हिटलररी क्रूरतेची
   मृत्यूशी झुंजवणारी
   मानवाच्या अमानूषतेची

फास फॅसिस्टाचा
लेंनीन ग्राडवर आवळला
थंड अन क्रूर डोक्याने
निष्पाप भुकेने तडफडला

पोटाच्या खळग्याने
माणूस पशु बनवला
अन्नापुढे अगतिक बनून
काळाने नरभक्षकही बनवला

लाखो लहान बालके
भुकेने तडफडून मेले
जगाच्या पोशिंद्या सांग माणसाचे
नैतिक अधः पतन कसे हे जाहले

तरीही ते झगडले
रक्त थेंब थेंब लढले
फोडुनी राक्षसी वेढा
राष्ट्रप्रेमी वीर ते जिंकले

         सागर



Friday, 10 May 2019

थेंबांतही इंद्रधनू
तो शोधायचा
दुखरे मन घेऊन
अश्रूंसह हसायचा
        -----सागर
जरी लाजरे
तरीही हासरे
 फुल गोजिरे
जरा बावरे
          ---- सागर
कळ्यांची जाहली फुले
फुलांचे पडले सडे
मृदगंध त्यांचा असा दरवळे
 प्रफुल्लित दशदिशा पहा गडे
सागर

Monday, 22 April 2019

वेळ बदलते
बदलतात रंग क्षितिजाचे
परीक्षा नको पाहूस जिंदगी
वेळ नेहमीच देते उत्तर आमचे

    सागर
अफाट विस्तारलेले
तारामंडल
ज्याचा अंत कोणास ठाऊक नाही
मस्तिष्काच काहीसं असंच
विचारांची खोली त्यातल्या
कोणास ठाऊक नाही
       सागर

Saturday, 6 April 2019

काही माणसं असतात
फुलपाखरासारखी
स्वतःत हरवणारी

भटकत असतात
काही तरी शोधत
जगाला वेड लावणारी
         सागर

Monday, 25 March 2019

हाताबाहेर गेलेली केस
सुटलेलं पोट असतं
जंग जंग पछाडा
ते आत जात नसतं
          सागर

Saturday, 23 March 2019

शांत हो मना
बरा नव्हे चंचल पणा
विचार त्या अवखळ वाऱ्यास
जाचतो किती अस्थिरपणा
सागर

शाप की देणगी
रात राणी निशाचर असण्याचा
भाग्य नाही तिजला प्रभाती
प्रभू चरणी समर्पणाचा
  सागर