labels

Friday, 31 May 2019

खोल झालेल्या जखमा
काळाबरोबर भासल्या भरलेल्या
वर वर दिसल्या गोजिऱ्या
आतुन मात्र तेवढ्याच ठस ठसलेल्या
      सागर
अंतरंग मनाचे
खोल अन गहिरे
ठाव ना ठिकाना
मापदंड सारे अपुरे
सागर

Monday, 27 May 2019

      फास लेंनीनग्राडचा
   कहाणी रक्त गोठवणारी
   हिटलररी क्रूरतेची
   मृत्यूशी झुंजवणारी
   मानवाच्या अमानूषतेची

फास फॅसिस्टाचा
लेंनीन ग्राडवर आवळला
थंड अन क्रूर डोक्याने
निष्पाप भुकेने तडफडला

पोटाच्या खळग्याने
माणूस पशु बनवला
अन्नापुढे अगतिक बनून
काळाने नरभक्षकही बनवला

लाखो लहान बालके
भुकेने तडफडून मेले
जगाच्या पोशिंद्या सांग माणसाचे
नैतिक अधः पतन कसे हे जाहले

तरीही ते झगडले
रक्त थेंब थेंब लढले
फोडुनी राक्षसी वेढा
राष्ट्रप्रेमी वीर ते जिंकले

         सागर



Friday, 10 May 2019

थेंबांतही इंद्रधनू
तो शोधायचा
दुखरे मन घेऊन
अश्रूंसह हसायचा
        -----सागर
जरी लाजरे
तरीही हासरे
 फुल गोजिरे
जरा बावरे
          ---- सागर
कळ्यांची जाहली फुले
फुलांचे पडले सडे
मृदगंध त्यांचा असा दरवळे
 प्रफुल्लित दशदिशा पहा गडे
सागर