labels

Monday, 21 November 2016

शब्द आज विस्कटतील
उद्या कदाचित जुडतील
शेवटी शब्दच ते
मला तुझ्यातही गुंतवतील
सागर....
आता मला सवय झालीय
एकटं एकटं राहण्याची
आठवणींच्या गर्दीत
स्वतःला सावरण्याची
सागर...
कधी कधी
होतं असं
पाण्यातलं दूध फक्त
राजहंस पितो जसं
सागर.....
मन मनाचे कधी कधी
ऐकतच नाही
नको तिच्या मागे ...तर
पिच्छा सोडतच नाही
सागर.....
लाली पसरली
पश्चिमेच्या नभात
राजा आकाशीचा मग
अदृश्य झाला नभात
सागर.......
तळ्याच्या काठी संध्याकाळी
आम्ही फिरायला जायचे
दगड तळ्याला मारायचो
तरंग मनावर उमटायचे
सागर.......
व्याकूळ ते
थेंब दवाचे
वाट पहाती
त्या रवि उदयाचे
सागर......
झुळझुळ म्हणे
वाहते पाणी
गात वाहते
प्रितीची गाणी
सागर......
आयुष्य एक
वर्तुळ असतं
जिथून सुरूवात करता
तिथं तुम्हाला यावंच लागतं
सागर.......
बराच काळ मी मौन राहिलो
शब्द छेडतात म्हणून अबोल राहिलो
मौनानं माझ्या बघ मग कहर केला
जीव तुझा कसा वेडा पिसा झाला
सागर.........

Sunday, 13 November 2016

वार्या वार्या थांब
एक गोष्ट सांगतो
मी जरी अबोल
दिलखुलास बोलतो मी
सागर.......
शेकोटीची ऊब
आज जाणवत होती
ज्वाला आगीची जणू
थंडी पित होती
सागर......
रंग कुंचल्यातले
आज थक्क जाहले
शिंपूनी त्यांना जेव्हा
चित्र प्रितीचे साकारले
सागर.....
होऊ दे जुगलबंदी
लेखणी तयार बोलली
तासून शब्द मग तिनेही
झडी भावनांची ऊठवली
सागर....

Friday, 11 November 2016

तू समोर असलीस की
वेळ गेलेली कळत नाही
मनाची समाधी आमच्या
भंग कधीच पावत नाही
सागर....

Monday, 17 October 2016

पूर येतो भावनांना
बुडून जाती विचार सारे
डोळे होती जलमय
वाहती फक्त विरह वारे
सागर......
गगनात पौर्णिमेला
शुभ्र चमकत होता
डाग त्यावरीचा
दृष्टीपासून वाचवित होता
सागर......

Wednesday, 28 September 2016

भंडावून जेव्हा सोडतात
आठवणी तुझ्या
न कळत वाढतात मग ठोके
हृदयाचे माझ्या
सागर....
तारा तोडल्यास
हृदयाच्या माझ्या
म्हणे संगीताची जाणच नाही
मनास तुझ्या
सागर.......
राहू दे म्हटलं एकवीसाचे पाढे
आपण बे पासून सुरूवात करू
म्हणे प्रेमावर पी.एच ड्या केल्या
माझा तू नाद नको करू
सागर......
कळ्या अबोल
का बरे असतात......?
सुर्यकिरण आला तरच
त्या का खुलतात....?
सागर....
शब्दांच्या मेळ माझ्या
तुला लागणार नाही
भलतेच चंचल ते
हाती येणार नाही
सागर,....
कुंचल्यातील रंग संपले
संपली लेखणीतील शाई
भाव मनातील मनात राहिले
त्याना ही नव्हती घाई
सागर....

Tuesday, 27 September 2016

डोळे बोलके तुझे  रे
नजरेत माझ्या विसावले
पापणी मी उघडताच
तिथून पुन्हा उगवले
सागर

Wednesday, 21 September 2016

पावसाच्या सरीनी
शब्दांना धुमारे फुटले
धुमारे पाहण्या मग
इंद्रधनु मेघाआडून उमटले
सागर......
पावसाच्या सरीनी
शब्दांना धुमारे फुटले
धुमारे पाहण्या मग
इंद्रधनु मेघाआडून उमटले
सागर......
बाण शब्दांचे तुझे
आव्हान मज देतात
घात मजकडून होईल
शर माझे संययमाचा सल्ला देतात
सागर
इंद्रधनुला जागे
पावसाने केले
सप्तरंगी प्रभा पाहण्या
मयूरही एकवटले
सागर......
नाठाळ वार्यासंगे
थेंब ही बरसती
वटवृक्ष मग ऊभा राही
जीवजंतू त्याखाली विसावती
सागर.....
अगणित थेंब गडे हे
अगणित जलबिंदू
गोळा झाले बघा हे
त्या निर्झराचे आरंभबिंदू
सागर
सागर सरितेच्या मिलनाने
अश्रू तिचे अनावर जाहले
मिसळून मग अश्रू तिचे
जल सागराचेही खारे जाहले
सागर
सद्गुणांचा अतिरेक म्हणे
दुर्गुणांत परिवर्तितो
शत्रूविरूद्धचा संयम
कोण मर्दानगी दर्शवितो
सागर.....
राती जागवतात मनाला माझ्या
पिळवटतात हृदयाचे धागे
आठवणीत तुझ्या सखे
मन धावे तुझ्या मागे
सागर .....

Sunday, 11 September 2016

गडे अशी रूसू नकोस
रूसलीस तरी फुगू नकोस
फुगायलाही हरकत नाही 
पण निदान फुटू तरी नकोस
....,सागर......
चतुर होती कोकीळा
घरटं तिनं बांधलंच नाही
कावळीचं मातृत्व कसलं
पिलातला भेद तिला कळला नाही...?
......सागर......
डोळ्यांवर ताबा असला तरी
मनावर माझ्या ताबा नाही
विसरलो असे तुला वाटले जरी
तुझ्यावाचून खरंच करमत नाही
..........सागर
विधात्या माझी जरा
दृष्टी तू बदलव
सारखा द्वेष दाखवण्यापेक्षा
प्रेमही एनलार्ज करून दाखव
सागर.....
तुझ्या नजरेचे
सवाल गहिरे होते
दिलेल्या उत्तराने
मन माझे तोलणार होते
सागर....,

Saturday, 10 September 2016

सांगायचं बरंच असतं
मन मनातच बोलून जातं
ऐनवेळी शिवलेल्या ओठांनी
बरंच काही निसटून जातं
.....सागर.......
शब्दांचे स्वैर वारू
बघ कसे उधळले
बंधन जगाचे
त्याने झुगारले
सागर

Thursday, 1 September 2016

शब्दांच्या सड्यात
मी बुजून गेलो
गंध घेता घेता
मीच फूल बनून गेलो
सागर,...
वेड न लावेल ते
सौंदर्य कसले
अन.....
सौंदर्याची तारीफ न करतील ते
आशिक  कुठचे.....
सागर
अचूक आहे नेम माझा
तीक्ष्ण माझे तीर
छेडू नको मला सखे
हृदये भेदण्यात मी माहिर
सागर
बरसणार नाही तो
पाऊस कसला
सरितेला सामावणार नाही
तो सागर कसला..
सागर
गर्दीत तार्यांच्या
मी हरवलो होतो
स्वयंप्रकाशित असूनही
का बरे बावरलो होतो
सागर
तोंड उघडलं की हल्ली
चारोळ्याच पडतात
मनातले विचार
डायरेक ओठावर येतात
सागर...

Monday, 15 August 2016

तू आजही आठवते
मोजकं बोलणारी
विचारलेल्या प्रश्नांची
मानेनेच ऊत्तरे देणारी
सागर
तुझं साधेपण
हेच विशेष होतं
माझ्या मनाला
आणखी काय हवं होतं
सागर
बरसू दे माझ्यावर
निदान शब्दांचे निखारे
कोणास ठाऊक कधी बरसतील
तुझ्या प्रितीचे फवारे
सागर
येतात तुझी कोरी पत्र
मला रात्रीचं जागवायला
मला ही तेवढीच सोबत
जिवनाचा एक एक दिवस ढकलायला
सागर
कधी कधी जाणवतं
प्रेम भ्रमाचा भोपळा
पण असं कसं त्यातला
भाव कसा असैल मोकळा
सागर
मनाला म्हटलं थांब रे
किती आता दमवशील
सुख दुःखांच्या झुल्यावर
मला किती रे झुलवशील
सागर

Saturday, 13 August 2016

या जिवनाची गणितं
देवा खरंच वेगळी आहेत
गोड साखर शरिरास विघातक
कारली मात्र पोषक आहेत
सागर....

Friday, 12 August 2016

पोतडीतले शब्द काढावे लागतात
तुझ्याशी बोलताना
एरवी अबोल असतो मी
चांदण्यांशी खेळताना
सागर
बोलतं कधीतरी
आमचं  मन
छेडतं मग तारा
त्या अबोला प्रितीच्या
सागर...,
घडघड बोललं की
मन मोकळं होतं
आम्ही ठार मुके
आता बरं... कसं  ????
सागर
जर काही हवं असेल
तर नम्र व्हावंच लागत
दुनियेशी वैर धरून
का कोण ज्ञानी होतं
सागर

Wednesday, 10 August 2016

संस्कृतीच लयास गेली......,

स्वातंत्र्यास माझा
विरोध कधीच नाही
स्वैराचारास मात्र
यत्किंचितही थारा नाही
           संस्कृतीने माझ्या
           मर्यादा ठरविली होती
            जुनाट जुनाट म्हणूनी
            तुम्ही तिची राख केली होती
इतिहासाची पाने उलटता
व्याभिचार अल्प होता
धिंडवडे आजचे पाहता
गाव गाव हळहळत होता
         लक्षात जेव्हा आले
         गावची स्थिती कशी बदलली
         हतबद्ध मी ही झालो
संस्कृतीच लयास गेली.......
संस्कृतीच लयास गेली........
..........सागर   यादव .............
उत्तरे आहेत माझ्याकडे
वेळ फक्त नाही
तसा जुगलबंदीत मी
एवढा हुशारही नाही
सागर
काव्य हे जणू
खेळ मना मनाचे
मृगजळासम कधी भासे
हे प्रेम वल्गनांचे
सागर
काव्य हे जणू
खेळ मना मनाचे
मृगजळासम कधी भासे
हे प्रेम वल्गनांचे
सागर

Friday, 5 August 2016

गुणधर्म सरितेचा
रौद्र दाखविण्याचा
आपण अजान बालके
हतबल...क्रौर्य पाहण्याचा
सागर
बोचणार्या गोष्टीही
हव्या हव्याशा वाटतात
जसं
काटा रूतवणारं फुलंही
सुगंध दरवळून जातं
सागर
हिरव्या मखमलीवरती
दवबिंदू तोललेले
जणू धरतीच्या नयनांमध्ये
आनंद अश्रू तरळलेले
सागर
हिरव्या मखमलीवरती
दवबिंदू तोललेले
जणू धरतीच्या नयनांमध्ये
आनंद अश्रू तरळलेले
सागर
डेरेदार वृक्षावरती
मयूरराज पहूडले
गर्द हिरव्या सृष्टीने
आनंद विभोर जाहले
सागर.....
बागेतली फुलं
तुम्हीच तोडायची
बाग किती उदास म्हणत
कपाळाला आठी पाडायची
सागर

Thursday, 28 July 2016

ध्येयानं झपाटनं
मला शिकायचयं
अविरत कष्टून
माणूस मला बनायचंय
सागर
विचारेन मनाला
मनाचि व्यथा
कदाचित सांगेल ते आपल्या
विरहाची कथा
सागर
मन आतूर
चहुबाजूंनी बरसायला
फक्त तुझी साथ हवी
चिंब चिंब भिजायला
सागर
हल्ली शब्द
मनाला शिवत नाहीत
कितीही धारदार असले तरी
साधा ओरखडाही उमटत नाही
सागर
पोतडीत माझ्या
शब्दच शब्द भरलेले
काढलेल्या प्रत्येक शब्दावर
तुझेच नाव कोरलेले
सागर
चिरतायत शब्द तुझे
माझ्या आसवांना
जरा आवर घाल
तुझ्या अनावर बोलांना
सागर

Tuesday, 26 July 2016

हल्ली जगाचा
विसर पडतोय
सखे ग तुझ्या नादात
देह आणि भान
माझे मी विसरतोय
सागर
शब्दमाळेचे मणी
गुंफता गुंफेना
सुखाचा धागा
सापडता सापडेना
सागर
मेंदूची दादागिरी
दिवसेंदिवस वाढली
हृदय पडले एकले
भावना व्यवहाराने घेरली
सागर
प्रेमाच्या पावसाने
मन हिरवळले होते
दूरवर सर्वत्र
गालिचे पसरले होते
सागर
पावसाचा एकच थेंब
जमिनीवर पडला
तहानलेल्या धरतीला
तेव्हा कुठे धीर आला
सागर
नटलेल्या धरती कडे पाहून
मन विचारात पडले होते
हीच का ती उजाड उनाड माय
दुष्काळात जिचे लावण्य हरवले होते
सागर
निसर्ग माझ्याशी
खूप खूप बोलतो.
झाडे ,पाने, वेलींची
गंमत मला सांगतो.
सागर
एक्कलकोंडी माणसे
चित्र विचित्र असतात
एकटं असून स्वतःचं
विश्व निर्माण करतात
सागर
मोठी माणसे
किती मोठी असतात
त्यांंचे विचार
गगनापेक्षा उंच असतात
सागर

Monday, 25 July 2016

ईच्छाना मुरड घालणं
काळाबरोबर जमत गेलं
पण कशातच ईच्छा न रहाणं
जीवनंच नीरस होत गेलां
सागर
मना रे........
मनाला म्हटलं
दमत कसा नाहीस
एका जागी शांत
बसत कसा नाहीस
     तुझ्या अशा वागण्यानं
     सगळे खुळा म्हणतात
     तत्वज्ञान पाजळू नकोस
     डोस तत्वज्ञानाचाच पाजतात
बंदोबस्त त्याचा कारवाया
या निष्कर्षावर पोहचलो
मनाला बांधून ठेवूया
मग आपण सुटलो
         मार्ग शोधत शोधत
         जिंदगी निघून गेली
        अट्टाहास माझा होता
        पण मनानेच मात केली
आता मात्र हरल्यावर
मनाप्रमाने वागतो
मनाकडून हरून
जीवन जगल्याचा आनंद वाटतो
    खरंच की राव
    बांधाय नको मनाला
    मुक्त बेभान होऊ दे
    आनंद तेच देईल तनाला
सागर.....
गंध पहाटेचा
काही औरच असतो
शांतता...प्रसन्नता
पहाटेचा गुणधर्मच असतो
सागर

Thursday, 21 July 2016

बोचलं असेल त्याला
मनाला येईल तेव्हा उमलणं
सुगंधाने भ्रमित करून
मकरंदापासून दूर ठेवणं
सागर
गुणधर्म कळीचा
 दरवळण्याचा
दोष का देता
फसवण्याचा
सागर
खट्याळ भ्रमर
नाठाळ कळी
पिरतीच्या खेळात
भ्रमर जातो बळी
सागर
भ्रमर पिंगतो
मकरंदासाठी
आव आणतो
पिरतीसाठी
...सागर
जखम हृदयाची
आता अबोल आहे
घाव देणारे
हृदयच फितूर आहे
सागर
विरह सख्या तुझा
तिच घालवेल
मदमस्त दरवळूनी
पिरतीत न्हाऊ घालेल
सगर
भ्रमराचं कोडं
कळीला कधीच ऊलगडलं नाही
रागावून मग तिने
पाशातून सोडलं नाही
सागर
मन थोडं बिझी आहे
भेटण्यास पण आतुर आहे
कळ थोडीच काढ
मग आख्खच तुझं आहे
सागर
हिस्से कसे करू
सांग मना तूच
दिल आहे तुकडा नव्हे
दर्यादिली दाखव ना तूच
सागर
दुनियाच चोरांची झाली
जगी न राहिला राम
सज्जनांचे जगणे मुश्किल
ऐटीत राहतो दाम
सागर

Wednesday, 20 July 2016

परक्या स्त्रीला मातेसम माननारी
भारतीय संस्कृती कुठे लुप्त झाली
पशूला लाजवणारे कृत्य करणारी
विकृती पवित्र भूमीवर कशी निपजली
      दोष कुणाचा हा...
      दोष कुणाचा.....
स्वातंत्र्याच्या पाईकानो
स्वैराचार हा कुणाचा
       रूढीवादी म्हणणार्यानो
       हा खेळ कुणाचा
पाश्चिमात्य पुरस्कर्त्यानो
संस्कृतीभेद हा कुणाचा
मागास आम्हा म्हणणार्यानो
हा जय का तुमचा.......?
सागर
गरज आहे समाजाला
एकवार सोचण्याची
संस्कृतीचे आपुल्या
पुन्हा जतन करण्याची
गरज आहे विचारांची
दिशा आज तपासण्याची
गरज आज नवपिढीला
समृद्ध सशक्त विचारांची
सागर
संस्कृती अशी आमची
सर्वाना सामावणारी
सर्वाना सामावता सामावता
स्वतःच लुप्त होणारी.....?
सागर
मंद लाट ती
अंगावर शहारणारी
नकळत थांबून
पुन्हा घोंघावणारी
सागर
सागराचे वारे
नेहमीच खारे खारे
गोड गोड पाऊस धारा
आणतात तेच ना रे
सागर

Sunday, 17 July 2016

काही माणसं मौन
ढालीसारख वापरतात
आयुष्यभर तलवारीचे
घाव झेलत राहतात
सागर
झोपेचं ढोंग केलेल्या
कसं जागं करणार
 संवेदनाच नसलेल्या मनाला
फुंकर तरी कशी घालणार
सागर
पाऊस माझा
रडवेल तुला
प्रेमाच्या आनंदाश्रूनी
सजवेल तुला
सागर
निरागस प्रेमाची
व्याख्या कठीण
फक्त निस्वार्थपणे देणं
जमणं .........महाकठीण
सागर
पैतरे जुनेच आज
वापरावेत म्हणतो
एखादं फूल आज
देऊनच बघतो
सागर
सारी गुपितं मी
रातराणीला सांगितली
मग काय सांगायचं
मुग्धपणे ती माझ्यासाठी बहरली
सागर

Saturday, 16 July 2016

वाटतं अज्ञानीच रहावं
डोंगर दर्या हुंदडावं
शहारातल्या दिखावेगिरिपेक्षा
निसर्गाच्या गोडव्यात रमावं
सागर
मंद लयीत
झरा खळाळत होता
दगड.... आडकाठ्या ...
कशाचीच तमा बाळगत नव्हता
सागर
आवडतं मला
तुझं अबोल वागणं
डोळ्यात माझ्या पाहून
घडाघडा बोलणं
सागर
अनपेक्षितपणे तुझं येणं
नवं नव्हतं माझ्यासाठी
पण....घसघशीत स्माईल
बुमरँगच की.....माझ्यासाठी
सागर
दुःख सोसल्याशिवाय
सुखाची किंमत कळेल...?
प्रेम केल्याशिवाय
विरहाची बोच कशी उमगेल
सागर
थेंब चिमुकला
हातावर विसावला
दूरवरचा प्रवास
एकदाचा संपवला
सागर

Wednesday, 13 July 2016

बोलण्यातून भावना व्यक्त होतात
ऐकलंय कुठेतरी
पण
मौनात त्या लपतात
हे फसवंय काहीतरी
सागर

Tuesday, 12 July 2016

तसा मी निश्चल आहे
अभेद्य पहाडासारखा
ऊन असो वा वारा
कठीण वज्रासारखा
सागर
लढण्याची ईच्छा
आता उरली नाही
जबाबदारीचं ओझं
पेलवणारही नाही
पहात रहावंस वाटतं
भळभळणार्या जखमांकडे
सुख शोधण्याचा विचार
मनाला शिवतच नाही
सागर
लहान लहान गोष्टी
बरंच करून जातात
ईवल्याशा असून
माणसाला मोठं करून जातात....
सागर
रात्र सरली
दिवस उगवला
मनाच्या उदरातून पालवीचा
कोंब नवा उगवला
सागर
वेध लागले कळीला
सखे ग ऊमलण्याचे
विसरले देहभान आता
वेध फक्त मोहरण्याचे
सागर
ईमले सुख दुःखांचे
ईथेच ऊभारले होते
नियतीच्या लाटेने
भूईसपाट झाले होते
सागर

Monday, 11 July 2016

रात्रीची चाहूल
लागली संध्येला
करकचून आवळे
आपल्या प्रभेला
सागर
दिस सरले
जग फार बदलले ....
कालची पोर ती
पोलक्यात आली
दिस सरले 
जग  फार बदलले ......
कालच्या वेली
फळाने लगडल्या
दिस सरले
जग फार बदलले .........
बोरं यौवनाची
पिकून झडली
दिस सरले
जग फार बदलले.......
आयुष्य सरता
मन मोक्षासाठी आसुसले
दिस सरले
जग फार बदलले ........
सागर...
सांजसमय.............
सुरूवात झाली पाखरांची
घरट्याकडे परताया
आंकुचले क्षितीज
भास्करा गिळावया
स्वरात हंबरती वासरे
स्वागत धेनूचे करावया
पिल्लू वेडावे माझे
आतूर मज भेटावया
सांजसमय अशी ही उत्कट 
दोन जीवांचा मेळ करावया
सागर
मन ही आता
सूक्क्ष्म झालंय
ब्रम्हांडा एवढं
आकुंचलय
सागर

Sunday, 10 July 2016

अथांग समुद्रावर
नैया तुला हाकायचीय
वादळे असो वा वारे
तुला ती पारच न्यायचीय
सागर
तेच माझे शब्द
तुला सुन्न बनवतात
तेच तुझे डोळे
माझे शब्द बनवतात
सागर
मनाचा विरंगुळा
माझा मला देशील
बदल्यात तुला हवं ते
माझ्याकडून मिळवशील
सागर
मन माझे
पक्षी बनेल
अथांग सागरावर
स्वैर फिरेल
सागर
मला शिकवलंस तू
भावना जपायला
पण नाही शिकवलस तू
तुटल्यावर सावरायला
सागर
पहातच रहावेत
डोळे तुझे
अथांग सागरावर
तनहा मन जसे माझे
सागर

Thursday, 7 July 2016

मनाचा गुंता माझ्या
सख्या सोडवशील काय
बटाटा करू की वांगे
आता सांगशील काय?
😳😜
तुझे ते अल्लड हसू
गालावरील लटके रूसू
सांग आसे जर तुझे वागणे
का बरे मी नको फसु
सागर
भावनांचे महाजाल
अंतरी विनले
संस्कार अन भीतीमुळे
आतच कोमेजून गेले
सागर
 मनाच्या गर्भातून
भाव तो उमलला
तू समोर दिसताच
ओठातून तो स्फुरला
सागर
रडायला तुम्हाला येतं
याला आमची हरकत नाही
पण हसायला येण्यासाठी
प्रयत्न करायला मुळीच हरकत नाही
सागर
मिनमिनत्या ज्योतीला
आधार सावलीचा
अंधार तिचा वैरी
पण आधार त्याच माऊलीचा
सागर
वाट बघून दमला होता
जीव तो जाणारा
प्राण शेवटी सोडला
अतृप्त आसहाय बिचारा
सागर
जशी रात्र वाढते
तसा मनाचा सूर्य ऊगवतो
मग सुर्याच्या चांदण्यात
विरह न्हाऊन निघतो
सागर
मला एकट्याला एकट्याशी
भांडायला आवडते
आपणच रुसून आपणच
समजूत काढायची
सागर

Tuesday, 5 July 2016

भरभरून दिलं की
भरभरून मिळणार
नियतीचा नियमच तो
अपवाद कसा ठरणार
सागर
रंग सप्तरंगी
पिरतीत उतरले
प्रित झाली बावरी
रंगीबेरंगी जाहली
सागर
माती चिखल
मंद मंद गारवा
मखमली हिरवळीत गातो
धुंद धुंद पारवा
सागर
निखार्यांची फुले बनवूया
झुंज नियतीशी देऊया
कष्ट उपसून दोघे
दुःखातही सुख शोधूया
सागर
दुःख गिळावं
सुख ओकावं
गरदीत माणसांच्या
जीवन असंच जगावं
सागर
दुःख गिळावं
सुख ओकावं
गरदीत माणसांच्या
जीवन असंच जगावं
सागर
विचारांची घालमेल
थांबव आता देवा
शांति अन स्थिरता दे
हेच मागणे आता
सागर
तरंग विचारांचे
पाण्यात विरून गेले
वाट बघून तुझी
तळात बुडून मेले
सागर
रात्र जितकी सुरेख
तितकीच भयाण होते
डोळे झाकून झोपा
हे तर मनाचेच ईमले
सागर
मनास काय हवे 
कधीच कळले नाही
ऊत्तरे शोधता शोधता
बेहाल बेचैन मी
सागर
दुनिया ही बेगडी
लोक ईथले दिवाने
प्राणास प्राण देतील
फक्त प्रेम दिलात हवै
सागर
नको करू काळजी रे
दोस्त आहे तुझा रे
जखम तुझी ती माझी
भरेन मी माझ्या दुव्याने
सागर
पणती
जीव ईवला जरी
मंद मंद जळते
असीम अंधाराला
बेधडक ती चिरते
सागर
क्षण आयुष्याचे
जाणारच आहेत
दुःख करत बसून
पुन्हा का येणार आहेत
सागर यादव
माहितीय अहम माझ्या
नसानसातून वाहतो,
त्यामुळेच ....
जंगलचा राजा
एकटाच राहतो.
सागर यादव
कातरवेळ माझी
यमयातनांसम भासते मज
आठवणी एक एक तुझ्या
विदीर्ण वाळवंटासम भासती मज
सागर यादव
एकमेव मार्ग आहे
बाकी सर्व झूठ
आणि व्यर्थ आहे.
जीवनात मोक्ष हवा
हे एकमेव सत्य आहे.
सागर यादव
हुशार माणसं
भावनिक असतात
मग भावनिक माणसं
हुशार नसतात?
सागर यादव
वाळूचं घड्याळ पाहिलं की
अनामिक भीती दाटते
क्षणाक्षणाने तीळातीळाने आयुष्य संपतंय
याची धास्ती वाटते..
सागर 
ढगच नसतील तर
पाऊस कोठून येणार
लोणीच नसेल तर
कृष्ण कोठून येईल
सागर
चारोळ्यांनी मनात माझ्या
थैमान मांडले
कर्णाला धर्म अन
धर्माला दुर्योधन  बनविले
सागर
रात्रीचं एकटं फिरायला
मला खूप आवडायचं
तुझ्या आठवणींची सोबत आसल्यावर
आणखी कोणाला घाबरायचं
सागर यादव
दाढी करताना
एक चारोळी ऊगवली
तिच्या नादात
बिनपाण्याने खारडली
सागर
अंधःकारात बुडालेल्या
मनाला मी समजावलं
निशेनंतर पहाट  असते
त्याला मग उमगलं
सागर यादव
पौर्णिमेचा चंद्र
सगळ्यानाच आवडतो
आमावस्येला कुठल्या गर्तेत असतो
याची फिकीर कोण करतो
सागर
क्षण क्षण आयुष्याचा
आस्वाद मला घ्यायचाय
टपोर्या एक एका थेंबात
चिंब चिंब न्हायचंय
सागर
दुपारी चोच वासणारे पक्षी पाहुन
 जीव तीळ तीळ तुटतो
निर्बुद्ध मानवाच्या पापाची फळं
बिचारा मुका जीव सोसतो
सागर
निसर्गाचं चक्र
कधी थांबणार
कर्मातून मुक्तता
कधी मिळणार
सागर यादव
पाऊस म्हटलं की
थंड वारा
पाऊस म्हटलं की
म्ंद धारा
अन कातरवेळ म्हटल की
जुन्या आठवणींचा मारा
सागर यादव
कुणी कुठे जायचं
कुणी कसं वागायचं
हे आपण ठरविणारे कोण
अर्जुन जरी योद्धा
महानायक कृष्ण  तो थोर
   सागर
गंध मातीचा
नभापर्यंत पोचला
भावांची करामत पाहून
थेंबाना आणखी जोर चढला
सागर

Monday, 4 July 2016

सावलीही सोडून गेली
काय करावे कळेना राधेला
गोपीही फितुर झाल्या
त्या नटखट नंदलालाला
सागर
आनाभाका तुझ्या
आनाभाकाच राहिल्या
तुटणार्या तारका
तुटतच राहिल्या
सागर यादव
भारतीय संस्कृती
भारतीय राहिलीय का हो
शुभ्ंकरोती अन परवचा
कोणा घरात पाहिलीय का हो
सागर यादव
सुर्य आज
दडला होता
ढगांच्या शालीमागे
बिनदास्त झोपला होता
सागर

Thursday, 17 March 2016


                                                  

                                         With Arav