labels

Sunday, 3 June 2018

भला थोरला तो वृक्ष
उन्मळून पडलेला
रात्रीच्या वादळ वाऱ्यात
अखेरचा श्वास त्याने घेतलेला

का असे घडले असावे
हिमालयापरी अढळ
निश्चल असा ज्याचे
समूळ उच्चाटन व्हावे

आजवर कित्येक त्याने
वादळे त्याने पाहिलेली
काल रात्रीच का बरे त्याने
स्वतःहून आहुती दिलेली

असेल का हा
महिमा काळाचा
एकदा फिरला की
अंत त्याचानिश्चित व्हायचा
   सागर

Sunday, 6 May 2018

शृंखला विचारांची

पहिल्या विचाराला
दुसरा चिकटतो
तिसरा दुसऱ्याला चिकटून
हळू हळू शृंखला  बनवतो

विचारांच्या शृंखलेला
दोनच मार्ग असतात
सकारात्मक व नकारात्मक
परस्पर विरोधी असतात

सकारात्मकतेतून
आनंद प्राप्ती होते
नकारात्मकता मात्र
नरकाची वाट दाखवते

सकारात्मक व्हायचे तर
जागरूक व्हायला हवे
नकारात्मक तेवढे विचार
शृंखलेतून बाहेर काढायला हवे
            सागर

Thursday, 26 April 2018


नात्याला गेलेला तडा
दिसताना सूक्ष्म दिसतो
वज्रासारख्या खडकाला
लागलेला सुरुंग असतो
         सागर

Friday, 9 March 2018

विचार पुरुषी
पहा ना कसे असतात
म्हणे स्त्रियांवर
अधिराज्य गाजवतात

भारतात संस्कृती
आपण महान म्हणतो
चाकोर्यांच्या वाटेवरून
आपण इथे चालतो

पश्चिमात्यांच्या साहित्यात
चाकोऱ्या भिन्न भासतात
स्त्रिला पुरुष तिथे
सम समान वागवतात

आमच्या इथे परंपरेने
Dominancy बिंबवली
न कळत स्त्रीने इथे
नरमाई अंगिकारली

ढाचा कुटुंबसंस्थेचा
बदलणे कठीण आहे
समानता राबवायची तर
एल्गार स्त्रीच्याच हाती आहे

         सागर

Thursday, 8 March 2018

चेहऱ्यावरी आलबेल
जरी सारे भासे
कासावीस जीवा तू
का भरसी उसासे
         सागर