labels

Wednesday, 22 November 2017

धकाधकीत सार्या
जगण्यास वेळ नाही

दमलो पळू पळूनी
थांबण्यास वेळ नाही

जीवन रडगाणे झाले
हसण्यास वेळ नाही

खोल उरी या जखमा
रडण्यास वेळ नाही

नात्यांत उसवले धागे
शिवण्यास वेळ नाही

जाण्याची वेळ आली
जगण्यास वेळ नाही

       सागर 
पाउस पडत असताना
पाखरे घाबरून दडतात
एकदा का उघडला
गाणी गात सुटतात 
         सागर

Saturday, 18 November 2017

आता मला सवय झालीय
एकट ऐकटं राहण्याची
आठवणींच्या गर्दीत
स्वतःला सावरण्याची
    सागर
रात्र अन थंडीची
गट्टी तशी जुनीच
अंधारून आलं की
हुडहुडी भरून आलीच
      सागर
पहाडावरच्या त्या दगडाला...
कसं बरं जमत;
सर्व काही सोसून
एकट राहणं बर जमतं.
        सागर
मन माझं स्थिर नसतं
चंचल तरी कुठं असतं
नुसतच वल्गना ठोकत
 प्रत्यक्षात कुठं काय करत
           सागर

Thursday, 16 November 2017

मनाला विचार
सावलीसारखे चिकटलेले;
क्षणभंगुर दोन्ही तरी
पडसाद ठळक उमटलेले.
            सागर
सावलीला म्हटलं थांब
तुला करकचून बांधतो
माणसा किती रे खुळा
स्वतः च स्वतःला जखडतो
           सागर
स्वप्नानाही तू
सावलीसारखी चिकटलेली,....
श्वासांनी स्वामींनी
तुलाच निवडलेली....
       सागर